सांग तू माझी होशील का?
माझी होऊन माझ्यावरती
प्रेमवर्षा करशील का?
सांग तू माझी होशील का?
मला दीसणार्या स्वप्नातली
स्वप्नसुंदरी तू होशील का?
पहाटेस माझ्यावर पडणारे
प्रथम सूर्यकिरण तू होशील का?
सप्तसूरात तू गात असताना
होईन तुझा स्वर मी,
अश्रू तुझे पुसणारा
रेशमी रुमाल होईन मी,
आनंदात तुझ्या ओठावरचे स्मित होईन मी,
दुःखात तुझ्या जखमांवर मलम लाविन मी,
आयुष्यभर पुरणारा तुझा खरा मित्र होईन मी,
एकांतात तुझा मनाचा विरंगुळा होईन मी,
पण सांग न एकदा तू
माझ्या मनाची राणी
खरच तू माझी होशील का?
तुषार खेर
No comments:
Post a Comment