Monday, 12 November 2012

झुकवली ती मान मी, जी ताठ होती


झुकवली ती मान मी, जी ताठ होती

शुभानन चिंचकर's picture
झुकवली ती मान मी, जी ताठ होती
हाय, माझ्याशीच अंती गाठ होती
मी कुठे पुसले, मला का टाळले तू?
कारणे सारी मला ती पाठ होती
केवढी दूरी तुझ्यामाझ्यात होती
नाव मी बुडतीच अन तू काठ होती
केवढी तू शूर अन दिलदार होती
घाव जेथे घातले ती पाठ होती
'अरुण' नाही खंत त्या ताटातुटीची
माहिती होतेच, ती निरगाठ होती!

No comments:

Post a Comment