Tuesday, 13 November 2012

नव्याने


नव्याने

RUSHIKESH's picture
अता रान हे पेटवूया नव्याने
चला देश हा सावरूया नव्याने
जिथे राम आणी रहिम एक आहे
अशी तिर्थयात्रा करूया नव्याने
जगी सर्व जातीत सामावला जो
अशा इश्वराला स्मरूया नव्याने
तुझ्या वाटण्या, रे नको मायदेशा
कुठेही अता वावरूया नव्याने
कुठेही वहा, पण तरी गंध देते
फुलासारखे दरवळूया नव्याने
कुणा पाहिजे भांडणे रोजची ही ?
इथे प्रेमही वाढवूया नव्याने !
अता एक होऊ, अता एक राहू
उठा बांधवांनो जगूया नव्याने !!!

No comments:

Post a Comment